झिराड ग्रामपंचायतीने उभारले रायगड जिल्ह्यातील पहिले अद्यावयात कोविड विलगिकरण कक्ष राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

झिराड ग्रामपंचायतीने उभारले रायगड जिल्ह्यातील पहिले अद्यावयात कोविड विलगिकरण कक्ष

अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने अद्ययावत असे दहा बेडचे विलगिकरण कक्ष तयार केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अलिबाग तालुका हा आजही कोरोनाच्या विळख्यात आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव हा सर्वाधिक आहे. कोरोनाची लक्षणे कमी असलेल्यानाही विलगिकरण कक्षात दाखल करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने अद्ययावत असे दहा बेडचे विलगिकरण कक्ष तयार केले आहे. Zirad GramPanchayat has set up the first updated Covid isolation Center in Raigad district

रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी यासाठी पुढाकार घेतला. झिराड आदिवासीवाडी येथे आज या नूतन कोविड सेंटरचे उदघाटन शेकापच्या जिल्हा महिला प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी झिराड गावच्या सरपंच सौ.दर्शना भोईर, शंकरराव भोईर, गटविकास अधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कोरोनाने मृत्यू झालेले ग्रामपंचायत सदस्य स्व. शैलेश सदानंद चोपडे याचे नाव या रुग्णकेंद्राला दिले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव हा सर्वाधिक आहे. त्यामुळे अनेकवेळा ग्रामीण भागातील रुग्णाला रुग्णालयात जागा मिळणे कठीण होऊ जाते. शासनाने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातच विलगिकरण कक्ष तयार करण्याचे निर्देश दिले होते.

रायगड जिल्हा परिषदेचे मापगाव गटातील सदस्य आणि विद्यमान समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांनी याबाबत पहिले पाऊल उचलले आहे. झिराड ग्रामपंचायत ह्दद्दीतील आणि परिसरातील गावातील कोरोना बाधित रुग्णांना गावातच उपचार मिळावेत यासाठी वातानुकूलित असे अद्ययावत 10 बेडचे विलगिकरण कक्ष ग्रामपंचायत निधीतून तयार केले आहे.

या वातानुकूलित विलगिकरण कक्षात रुग्णांना मनोरंजनासाठी टेलिव्हिजनची सुविधा करण्यात आली आहे. तसेच चित्रलेखा पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. खाजगी डॉक्टरची नियुक्ती ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली असून रुग्णाच्या खाण्या-पिण्याची सोयही करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात झिराड ग्रामपंचायतीने स्वतः तयार केलेले हे पहिले वातानुकूलित अद्यावत विलगिकरण कक्ष ठरले आहे.

कोरोनामुळे ग्रामपंचायत सदस्य शैलेश चोपडे त्यांचे वडील व त्यांचे बंधू यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरात कमावते कोणी नसल्याने ग्रामपंचायतीतर्फे चोपडे कुटूंबाला दहा लाखाची आर्थिक मदतही यानिमित्ताने देण्यात आलेली आहे. कोरोना संपल्यानंतर भविष्यात या रुग्णकेंद्राचा वापर हा ग्रामपंचायत रुग्णालय म्हणून करणार असल्याचे दिलीप भोईर यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT