-- प्राची कुलकर्णी
पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या नोकरभरतीच्या घोळानंतर सरकारने आयबीपीएस (IBPS) , एमकेसीएल (MKCL) आणि टिसीएस (TCS) या तीनच एजन्सीज मार्फत परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र, यानंतरही राज्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये होत असणारी आरोग्यभरतीची प्रक्रिया न्यासा (Nyasa Company) कडूनच होत असल्याचं स्पष्ट झालंय. काही महिन्यांपूर्वी ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, त्यावेळीही प्रवेशपत्र वगैरे प्रक्रियेत गोंधळ झाले.
हे देखील पहा :
त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता त्यासाठीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदांकडून या संबंधीची रिक्त जागांबाबतची माहिती ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातली धक्कादायक बाब म्हणजे यातली अर्ज भरण्याची प्रक्रिया यापुर्वीच पूर्ण करण्यात आली आहे.
त्यातील परीक्षार्थींची संपुर्ण माहिती ही या खासगी कंपनी कडेच आहे. यामध्ये परीक्षा एकच होणार असून निकालही एकच लागणार आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं शुल्क भरायला सांगण्यात आलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सर्व ठिकाणची परीक्षा द्यायची आहे त्यांना जवळपास १७००० रुपयांपर्यंतची फी भरावी लागण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा या परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.