yuvraj sambhajiraje chhatrapati, jalna, maratha reservation, antarwali sarathi saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Andolan Live News : ...तर पहिली गाेळी माझ्यावर झाडा..., मराठा आंदाेलकांच्या भेटीनंतर संभाजीराजे भडकले (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- लक्ष्मण साेळुंके

Jalna Andolan : मराठ्यांवर जर गोळ्या झाडायच्या असतील तर पहिल्यांदा माझ्यावर झाडा. तुमचं सरकार दिल्लीत आणि राज्यात आहे. मराठा समाजाला आणखी किती दिवस आरक्षणासाठी (maratha reservation) वाट बघायला लावणार असा संतप्त सवाल युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati latest marathi news) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. (Maharashtra News)

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज (शनिवार) येथील अंतरवाली सराटी (antarwali sarathi) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदाेलकांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजेंना घडलेली घटना सांगताना आंदाेलकांना अश्रु अनावर झाले.

आंदाेलकांच्या भेटीनंतर राजेंनी राज्यासह केंद्रातील सरकारवर टीकेची झाेड उठवली. संभाजीराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं वंशज म्हणून मी इथं आलो आहे. आज पर्यंत मराठा सामजाने समंजसपणे आंदोलन केले, कुठं ही गालबोट लागलं नाही. काल जे काही घडलं ते निंदनीय आहे. लोकांच्या अंगावर ग्रेनेड फेकण्यापर्यंत मजल गेली.

निजामचे राज्य आहे की काय इथं, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सरकार चालवत आहात हे लक्षात ठेवा असा इशारा राजेंनी दिला.

मराठ्यांवर जर गोळ्या झाडायच्या असतील तर माझ्यावर पहिले झाडा असेही राजेंनी नमूद केले. ते म्हणाले तुम्ही हल्ले करुन आंदोलकांवर गुन्हा दाखल करता कमाल आहे. तुमचं सरकार दिल्लीत आणि राज्यात आहे. किती दिवस आरक्षणासाठी वाट बघायला लावणार आहात. देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे गोळ्या झाडायला काेणी लावल्या. आता हे सहन केले जाणार नाही. किती दिवस आंदोलन करायचं असा संतप्त सवाल राजेंनी उपस्थित केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT