अकोल्यात पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवासेनेचे बैलगाडी- सायकल आंदोलन अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवासेनेचे बैलगाडी- सायकल आंदोलन

केंद्र सरकारच्या वतीने दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ होत आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : केंद्र सरकारच्या वतीने दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ होत आहे. आधीच सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सततच्या होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीस आले आहे. त्यामुळे राज्यभर युवासेनेचे पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

अकोल्यातही सेना आमदार विपल्व बाजोरिया यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी सह सायकल रॅली काढण्यात आली आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन चौकातून ही रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत शहरभर ही रॅली काढण्यात आली आहे.

' होश में आयो मोदी सरकार, बहुत ही महंगाई की मार' आदी घोषणाबाजींनी युवासेनेच्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात आमदार विपल्व बाजोरिया, युवासेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप पाटील, राहुल कराळे आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?

Entertainment News : अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्या घरी चिमुकलीचे आगमन

Eye care tips: मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होतोय परिणाम? दुर्लक्ष केल्यास दृष्टीला बसू शकतो मोठा फटका!

SCROLL FOR NEXT