वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला साप अरुण जोशी
महाराष्ट्र

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला साप

अरुण जोशी

अमरावती - नांदगाव शहरासह nandgoan city तालुक्यातील ग्रामीण भागातील rural area गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव unstable electricity supply सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. लोडशेडिंग load shading नसतांना वेळी - अवेळी वीज जाते, त्यामुळे अचानक युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप सोडल्यामुळे अधिकाऱ्यांत प्रचंड धावपळ सुरू झाली. Yuva Sena released a snake at the office of the power distribution company

हे देखील पहा -

स्थानिक वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात युवा सेनेने अचानक साप सोडो आंदोलन केले. सतत वीजेचा लपंडाव सुरू असून उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे यांना तक्रारी देऊन सुद्धा विजेचा खेळखंडोबा थांबला नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून बहुतांश भागात व्होलटेज नसल्यामुळे नगरपंचायत व ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. स्ट्रीट लाईट बंद पडले, त्यामुळे पावसाळ्याचे दिवस असून दररोज साप निघत आहे. म्हणून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे एक महिन्यापासून नागरिक त्रस्त आहेत.

स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीन व इतर यंत्रे व्होलटेज अभावी निकामी झाले आहे. अनेक सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप सोडो आंदोलन केले व सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. यावेळी सरपंच गोकुळ राठोड, सूरज औतकर, निखिल मोरे, निलेश निंबरते, पवन ठाकरे, अक्षय राणे, अजय काळे, धनंजय भडके, आशिष हटवार, पंकज रामगावकर, पवन पुसदकर,अक्षय तुपट, आशिष भाकरे, पवन मोकडेकर, अभय बनारसे, शुभम रावेकर, अमन मानकर, रोशन भातुलकर, विक्की बविस्थळे, सागर गटूले, तेजस जवळकर, श्याम मुळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT