Sangli, dengue  saam tv
महाराष्ट्र

Sangli News : डेंग्यूने युवकाचा मृत्यू; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर राेष

आमच्या मागणीकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालक्यातील वड्डी या गावात एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. शीद्रामा गणपती खोबरे असे मृत युवकाचे नाव आहे. युवकाचा डेंग्यूने मृत्यूने झाल्याने खोबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Maharashtra News)

मिरज (miraj) तालक्यातील वड्डी गावात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. खोबरे मळा याठिकाणी एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. शीद्रामा गणपती खोबरे असे तरुणाचे नाव आहे. शिद्रामा खोबरे यांना ताप आल्यानंतर रुग्णालय दाखल करण्यात आले होते. (Sangli Latest Marathi News)

डेंग्यू तपासणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर खोबरे कुटुंबाने, ग्रामपचांयतीला (grampanchayat) डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पण याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

परिणामी रुग्णाच्या संख्येत वाढ होत गेली आहे. सिद्राम खोबरे यांचा बळी गेल्यानंतर मग डास प्रतिबंधक औषधे फवारणी करण्यासाठी ग्रापंचायतीला जाग आली. तरूणाचा डेंग्यूने बळी गेल्याने खोबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT