Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident : गणपतीचे दर्शन घेऊन गावी परतताना झाला अपघात: एक ठार, एक गंभीर जखमी

पाेलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.

अभिजीत घोरमारे

Bhandara Accident News : ब्रह्मपुरी येथून गणपतीचे दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना चार चाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात (accident) एका जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर जवळील चप्राड पहाडी जवळ घडली. पाेलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी : विक्की अरुण ठाकरे व जयघोष अरुण निसार हे दोघेही ब्रम्हपुरी येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित यात्रा बघण्यासाठी सायंकाळी आसोला वरून गेले होते. रात्री उशिरा पर्यंत ब्रम्हपुरी येथे गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे आपल्या मोटारसायकलने परत येत असताना छप्राड पहाडी जवळ लाखांदूर वरून वडसा कडे जाणारी चार चाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिली.

यात मोटारसायकलस्वार विक्की ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. जयघोष मीसार हा गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे अपघातातील चारचाकी वाहन पलटली असून गाडीच्या चालक वाहन सोडून पळाला. चप्राड येथील काही नागरिकांनी जखमीला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. या अपघाताचा तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

SCROLL FOR NEXT