kailas luchare saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News : गुंज लोणी रस्त्यावरील अपघातात हरणासह दुचाकीस्वाराचा मृत्यू

पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

राजेश काटकर

Parbhani Accident News :

पाथरी तालुक्यातील गुंज लोणी रस्त्यावर हरणाची दुचाकीस्वाराला धडक बसली. या अपघातात हरणाचा मृृत्यू झाला. दरम्यान या घटनेतील उपचारार्थ रुग्णालयात दाखल असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कैलास लुचारे असे मृताचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गुंज येथील कैलास गुलाब लुचारे (वय 40 वर्ष) हे रविवारी (ता. २१ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्त गुंज येथून बाभळगावफाटाकडे जात होते.

गुंज पासून दिड किलाे मीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला शेतातुन आलेल्या हरणाने जोराची धडक दिली. यामध्ये हरण जागीच दगावले. तर दुचाकीवरील कैलास लुचारे हे गंभीर जखमी झाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेची माहिती रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरीकांना समजली. त्यांनी जखमीच्या कुटुंबीयांना सांगितले. जखमीला पाथरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान आज कैलास लुचारे यांचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT