Crime News  Google
महाराष्ट्र

Latur News : लातुरात युवकाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

दीपक क्षीरसागर

Latur News : लातूर (Latur) शहरात घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश सानप असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) तक्रार दाखल केली असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. मात्र, अविनाशच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. (Latur Latest News)

अविनाश बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालयाजवळ माधव अपार्टमेंटमध्ये राहत होता. माधव अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Maharashtra News)

अविनाशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी अविनाशचा मोबाईल ताब्यात घेतला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अविनाश लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयामध्ये पदविकेच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याच सोबत तो राज्यसेवेच्या परीक्षेचीही तयारी करत होता. अविनाशला एक बहीण असून ती इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. आई-वडील लातूरपासून जवळच असलेल्या मुरूड येथे शिक्षक आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT