Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारला म्हणून मारहाण, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime News : जवळपास अडीच महिने या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

ओंकार कदम

Satara News : बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारायला गेलेल्या तरुणाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. जवळपास अडीच महिने या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील पांगारे गावातील राहुल पवार या युवकाने बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारल्या कारणातून 5 मे रोजी त्याला टोळक्याने बेदम मारहाण केली होती. लोखंडी रॉड, लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण केली होती. या युवकाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

युवकाला मारहाण करणाऱ्या 12 जणांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र या युवकाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सर्व 30 आरोपींवर गुन्हा दाखल करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. संतप्त गावकऱ्यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर तरुणाचा मृतदेह आणून ठेवला होता. (Crime News)

गावकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT