youth congress rasta roko andolan at bhandara saam tv
महाराष्ट्र

Bhandara : जिल्हा कामगार कार्यालयाचा ढिसाळ कारभार, भंडा-यात जिल्हा युवक काँग्रेसचा रास्ता राेकाे

पोलीस प्रशासन व कामगार कल्याण भंडारा येथील अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

जिल्हा कामगार कल्याण कार्यालयातील कामकाज दिरंगाईने हाेत असल्याचा दावा करीत आज (साेमवार) भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयासमोरील मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनाच्या माध्यमातून युवक काॅंग्रेसने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

बांधकाम कामगार मंडळातर्फे होत असलेल्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी भंडारा जिल्हा कामगार कल्याण कार्यालयात होत आहे. या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाच्या वतीने नोंदणीसाठी येणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जातोय. अखेर भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हा कामगार कार्यालयासमोरील मार्गावर रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर पोलीस प्रशासन व कामगार कल्याण भंडारा येथील अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू, तालुकास्तरावर नोंदणी व वितरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन युवक काॅंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT