Yavatmal Crime Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं! दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धारदार शस्त्राने पोट आणि मानेवर वार

Yavatmal Crime News : यवतमाळमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. धारदार शस्त्राने पोट आणि मानेवर वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : राज्यात हत्येचं सत्र सुरुच आहे. यवतमाळमध्येही दिवसाढवळ्या तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळच्या चांदणी चौकात भरदिवसा तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे .

यवतमाळ शहरातील चांदणी चौकात भरदिवसा एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या इमारतीजवळ ही थरारक घटना घडली. मनीष शेंद्रे असे हत्या झालेल्या ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. मनीष यवतमाळच्या पाटीपुराजवळ राहायला होता. मनीषची भररस्त्यात हत्या करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, मनीषच्या पोट आणि मानेवर सपासप वार करून त्याची हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. तरुणाच्या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याची चर्चा सुरु आहे.

हत्येच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहेत. तरुणाच्या हत्येने कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिल्लीतील तरुणीची अकोल्यात हत्या

दिल्लीतील 26 वर्षीय तरुणीची अकोल्यातील मूर्तिजापूरात हत्या झाली. तब्बल ११ महिन्यानंतर हत्याकांडातील मारेकरी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. पोलिसांनी या प्रकरणी चेतन महादेव शृंगारे याला अटक केली आहे. अकोल्याच्या मुर्तीजापुरातील प्रतिक नगरात हत्याकांड घडलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिनाभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

SCROLL FOR NEXT