Beed Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: प्रेम प्रकरणाचा संशय, झाडाला बांधून २ दिवस मारलं, शरीर काळं-निळं; बीडमध्ये १० जणांवर गुन्हा दाखल

Shocking Honor Killing in Beed: प्रेम प्रकरणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तब्बल दोन दिवस झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच घडलेल्या घटनेमुळे बीड पुन्हा हादरले आहे. प्रेम प्रकरणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दोन दिवस या युवकाला घराच्या मागे असलेल्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास बनसोडे हा २५ वर्षीय तरूण जालन्याचा रहिवासी होता. तो आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. विकासचे क्षीरसागर याच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. याची माहिती क्षीरसागरला मिळताच त्यानं विकासला घराच्या मागे असलेल्या झाडाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपासात एकूण १० जणांकडून विकासला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बनसोडेच्या हत्येची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बनसोडेला अमानुष मारहाण झाल्याचं समजताच त्यांनी तपास सुरू केला, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.

याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हानकुडे यांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT