beed, buffalo, Parshuram Gurkhude saam tv
महाराष्ट्र

Birthday Gift : नेत्यास मित्रांनी वाढदिनी दिला रेडा गिप्ट

याची चर्चा आता जिल्ह्यासह विभागात माेठ्या प्रमाणात सुरू आहे.

विनोद जिरे

Birthday Gift : लहरी मित्रांचा अनोखा अंदाज बीडमध्ये पाहायला मिळालाय. बीडच्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नामवंत असणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांच्या दोस्तांनी त्यांना आवडणारे मात्र जगासाठी आगळवेगळे असलेलं गिफ्ट चक्क वाढदिवसानिमित्त दिलं आहे. (Parshuram Gurkhude News)

ढोल ताशांच्या गजरात मित्राला भेट म्हणून चक्क एक रेडा दिलाय. अन अनोख्या गिफ्टची चर्चा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळं हे गिफ्ट पाहण्यासाठी बीडच्या धोंडीपुरा भागात नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.

बीडचे नगरसेवक जगदीश गुरखुदे यांचे लहाने बंधु परशुराम गुरखुदे (Parshuram Gurkhude) यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मित्राच्या संकटात धावून जाणारे परशुराम गुरखुदे हे अनेक तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र कंपनीने त्यांच्यासाठी चक्क एक रेडा भेट म्हणून दिला आहे.

या रेड्याला पाहूनच भल्या भल्यांना घाम फुटेल. या रेड्याची उंची सहा फूट तर लांबी सात फूट आहे. असा डौलदार रेडा आणि त्याच्या अंगावर वाघाची डिजाईन केली आहे. हा रेडा ज्यावेळेस बीडच्या (beed) माळीवेस, धोंडीपुरा भागात वाजत गाजत आला त्यावेळेस नागरिक त्याकडे पाहतच राहिले.

काही क्षणासाठी गर्दीतून पाहिल्यानंतर वाघच आला की काय ? असा भास नागरिकांना होऊन लागला. हेच गिफ्ट (gift) पाहण्यासाठी नागरिकांनी (citizens) तोबा गर्दी केली होती. परशुराम गुरखुदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्याचे आणि उपक्रमाचं आयोजन केले जाते. मात्र, त्यांचा यंदाचा वाढदिवस हा खास ठरला आहे. दरम्यान याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT