Brutal Attack in Tuljapur Saam tv news
महाराष्ट्र

प्रेमात गुलीगत धोका! साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी; स्टेट्स ठेवला अन् काळंनिळं होईपर्यंत मारलं | Tuljapur

Brutal Attack in Tuljapur: प्रेमात फसवणुकीनंतर ठेवलेल्या स्टेट्सवरून तुळजापूरमधील तरुणाची अपहरण करून बेदम मारहाण. आरोपींना अजूनही अटक नाही. पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

प्रेमात फसवणुकीनंतर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना तुळजापूरातील सांगवी मार्डी येथे घडली आहे. आधी तरूणाचं अपहरण केलं. नंतर बेदम मारहाण केली. तरूणाच्या डोळ्यावर, तोंडावर, आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, अद्याप आरोपी मोकाट आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

योगेश काळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे गावातील एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. साखरपुडा झाल्यानंतर तरूणीनीनं योगेशसोबत बोलणं टाळलं. तसेच योगेशच्या मित्रासोबत विवाह केला. याची माहिती योगेशला मिळताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली.

त्यानंतर त्यानं व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स ठेवला. प्रेमात धोका मिळाला, अशा आशयाचं त्यानं स्टेट्स ठेवलं होतं. यानंतर रोहीत बागल, चेतन माने आणि सत्यवान चादरे, योगेशच्या या मित्रांनी मिळून त्याचं अपहरण केलं.तसेच निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली. चक्क काळीनिळं होईपर्यंत मारहाण केली. तरूणाच्या डोळ्यावर, तोंडावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

या घटनेनंतर योगेशला तातडीने धाराशिवमधील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर धाराशिव पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दहा दिवस उलटून गेले तरी, अद्याप तिन्ही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT