Akola Crime News in Marathi, Akola Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Akola : लहान भावाचे वहिनीसोबत संबंध; रंगेहाथ पकडल्यानंतर पतीलाच रॉडने मारहाण

Akola Crime News १ जूनच्या रात्री पती झोपायला जात असताना पत्नी आणि लहान भाऊ(प्रियकर) या दोघांना पतीने नको त्या अवस्थेत पाहिल्याने पती संतापला.

जयेश गावंडे

अकोला: पत्नीला रात्री लहान भावासोबत नको त्या अवस्थेत (Intimate Relationship) पाहिल्याने संतप्त झालेल्या पतीने त्या दोघांनाही याचा जाब विचारला आणि पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला रॉडने (Beaten By Iron Rod) मारून जखमी केल्याची घटना अकोल्यातील तेल्हारा (Telhara, AKola) तालुक्यातील एका गावात घडलीय. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येतात. त्यापैकीच ही एक घटना म्हणावी लागेल. (Younger brother Relations with Sister-in-law; After being caught red handed, her husband was beaten with a rod in akola)

(Akola Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार पतीने तेल्हारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी आणि लहान भावाच्या अनैतिक संबंधाबाबत दोघांनाही अनेकदा समजावून सांगितले. मात्र दोघांच्या वागणुकीत कुठलाच फरक पडला नाही. लहान भावाच्या आणि पत्नीच्या संबंधात पती अडसर ठरत असल्याने अनेकदा वाद होत होते. याप्रकरणी पतीने २०१८ मध्येच याची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान १ जूनच्या रात्री पती झोपायला जात असताना पत्नी आणि लहान भाऊ(प्रियकर) या दोघांना पतीने नको त्या अवस्थेत पाहिल्याने, याचा जाब विचारला असता पत्नी आणि लहान भाऊ याने पतीवर रॉडने हल्ला केला. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून पतीवर अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी पत्नीसह लहान भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT