Pandharpur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News : आईवर हल्ला करत दिवसाढवळ्या तरुणीला पळवलं; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केलं भलतंच कांड

पंढपूर (Pandharpur) शहरात एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला पळवून नेलं आहे.

भारत नागणे

Pandharpur Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पंढपुरात एक अशी घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. (Latest Marathi News)

पंढपूर (Pandharpur) शहरात एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला पळवून नेलं आहे. तरुणीला पळून नेताना त्याने तिच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला देखील केला आहे. या घटनेच तरुणीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या टाकळी बायपास रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. जखमी महिला तिच्या २१ वर्षीय मुलीला परीक्षेसाठी महाविद्यालयात दुचाकीवरून सोडवण्यासाठी गेली होती. यावेळी भर रस्त्यात देवगाव येथे राहणाऱ्या सागर घाडगे या तरुणाने त्यांची दुचाकी अडवली.

सागर आणि त्याच इतर मित्रांनी तरुणीसोबत तिच्या आईला शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर तरुणीच्या आईवर धारधार शस्त्राने वार केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत तिथेच सोडून आरोपीने (Crime News) तरुणीला घेऊन पळ काढला.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या महिलेला परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी सागर याचा शोध घेण्यासाठी एक पथक तैनात केले आहे. आईच्या नजरेसमोरच भरदिवसा एका तरुणीला पळवून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde-Deool Band 2 : "देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी..."; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद' पाहून साक्षात दिसतील स्वामी|VIDEO

Ladki Bahin Yojana : पात्र असतानाही ₹१५०० बंद; घरात कार नाही, तरीही नावावर नोंद कशी? लाडक्या बहि‍णींचा संताप

Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी महागड्या क्रिम नाही; हे ७ हेल्दी टेस्टी ड्रिंक्स देतील नॅचरल ग्लो

Woman Weight Loss Tips: 1 महिन्यात घटवलं ५ किलो वजन, पोटावरची चरबी कमी महिलेने असं काय केलं? वाचा

Maharashtra News Live Update: मोटेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्यातील RCC क्लास बंद

SCROLL FOR NEXT