Buldhana Saam
महाराष्ट्र

Buldhana: धक्कादायक! २५ वर्षीय तरूणाने एकाचवेळी २०० ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या; जागीच मृत्यू

A 25-year-old man consumed 200 blood pressure tablets: बुलढाण्यातील एका तरुणाने रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास २०० गोळ्या एकाच वेळी घेऊन आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

बुलढाणा: बुलढाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय युवकाने रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास २०० गोळ्या घेत आत्महत्या केली आहे. त्याने दुपारी गोळ्या खाल्ल्या. तरूण बेशुद्ध असल्याचे पाहताच त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पवन गव्हाळे (वय २५) असे मृत तरूणाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध गावातील तो रहिवासी होता. ही दुर्देवी घटना दुपारच्या वेळेस घडली. पवन घरी एकटाच असताना त्याने एकाच वेळी रक्तदाबाच्या २०० गोळ्या घेतल्या. यामुळे त्याची प्रकृती बिघडली.

त्याला तातडीने नांदुरा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवनने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT