Gondia News  Saam TV
महाराष्ट्र

Gondia News : तरुण आणि तरुणीचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह, शेतशिवारात नेमकं काय झालं?

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

Gondia News :

गोंदियातील देवरी तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतंर्गत येत असलेल्या गडेवारटोला शिवारातील शेतात युवक आणि युवतीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. युवक फांसावर लटकलेल्या अवस्थेत तर युवती मृतावस्थेत आढळली आहे. श्रीकांत कापगते (वय २३) आणि टिकेश्वरी मिरी (वय २१)अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची नोंद सालेकसा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

देवरी तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गडेवारटोला येथील शिवचरण आचले यांच्या शेतशिवारात गावातील श्रीकांत कापगते याचा मृतदेह फांसावर टांगलेला आढळला. तसेच त्याच्या बाजूला एक युवती मृतावस्थेत आढळली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मृतावस्थेत असलेली युवती फुक्कीमेटा/हलबीटोला येथील असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मृतावस्थेत आढळलेल्या युवतीच्या नाका-तोंडातून रक्त वाहिल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. पुढील तपास सालेकसा पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

घातपात की आत्महत्या?

तरुण आणि तरुणीचा दोघांचे मृतदेह शेतशिवारात आढळले आहेत. तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. तर तरुणीच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. तसेच तिच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचंही प्रथमदर्शनी दिसत आहे.

त्यामुळे दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. त्यानंतर प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केली की कुणी दुसऱ्याकडून घातपात करण्यात आला? याबाबत स्पष्टता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT