Nagar, City Bus, Accident, Police saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : सिटी बसची धडक, युवतीचा रुग्णालयात मृत्यू

सिटी बस चालकाबाबत पाेलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सुशील थाेरात

Nagar Latest Marathi News : सिटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवतीवर नगर (Nagar) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. रविना विठ्ठल सुद्रिक असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. (Breaking Marathi News)

रविना ही शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीस होती. नोकरीच्या निमित्ताने ती केडगाव येथे वास्तव्यास होती. तेथून नेहमीप्रमाणे कामावर येण्यास ती घरातून बसने प्रवास करीत हाेती. सिटी बस (bus) प्रेमदान चौकात आली.

रविना सिटी बसमधून उतरून रुग्णालयाकडे जात असताना ज्या बसमधून ती आली त्याच बसची तिला पाठीमागून धडक बसली. त्यात ती गंभीर जखमी (injured) झाली. या अपघातनंतर तिला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. तिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. रविना हिचे वडील (father) विठ्ठल सुद्रिक यांनी सिटी बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

SCROLL FOR NEXT