HIngoli Saam TV
महाराष्ट्र

Crime News: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; युवकाचा शाेध सुरु

संशयितला पकडण्यासाठी हिंगोली पोलिस पथके रवाना झाली आहेत.

संदीप नांगरे

हिंगाेली : हिंगोली (hingoli) येथील आदर्श महाविद्यालय परिसरात असलेल्या शासकीय आदिवासी वस्तीगृहातील एका युवतीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी औंढा तालुक्यातील वाळकी येथील योगेश धनवे याच्यावर पाेलीसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. (hingoli latest marathi news)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश याने संबंधित युवतीस लग्नासह वेगवेगळी आमिषे दाखवत चार मे रोजी हिंगोली येथून पळवून नेत वाशीम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने युवतीस घटनास्थळी सोडून देत तेथून पळ काढला.

या घटनेनंतर युवती हिंगोली पोलिसांना एका खाजगी रुग्णालयात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. युवतीच्या तक्रारीवरुन हिंगोली शहर पोलिसांनी योगेश धनवे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

Thursday Horoscope : सोनं, पैशांचं घबाड हाती लागणार; ५ राशींचे लोक डाव साधणार

Maharashtra Live News Update: उदगीरमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग, ट्रकमधील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट

पुणे शहर पोलीस दलात मेगा भरती, २००० पदांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज; प्रक्रिया कधी सुरु होणार?

Rahul Gandhi vs Amit Shah: राहुल गांधींचं ओपन चॅलेंज,अमित शहा भडकले; भर संसदेत तुफान शाब्दिक राडा

SCROLL FOR NEXT