Ambernath Railway Accident Update News SAAM TV
महाराष्ट्र

Ambernath News : लोकलमधून पडून जखमी झालेल्या 'त्या' तरुणीचा मृत्यू; १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज

Ambernath Railway Accident : वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आणि रेल्वे प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अजय दुधाणे

Ambernath Railway Accident Update News : अंबरनाथ-उल्हासनगर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तब्बल १४ दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आणि रेल्वे प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.

अंबरनाथजवळ (Ambernath) लोकलमधून पडून जखमी झालेल्या दिव्या जाधव या तरुणीची १४ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. १२ जानेवारीला संध्याकाळी दिव्या ही ब्युटी पार्लरच्या क्लासला जात होती. अंबरनाथ-उल्हासनगर या रेल्वे स्थानकांदरम्यान ती धावत्या लोकलमधून पडली. यात ती गंभीर जखमी झाली होती. (Railway Accident News)

दिव्याला जखमी अवस्थेत अंबरनाथ रेल्वे स्थानकात (Ambernath Railway Station) नेण्यात आलं. तिथे ॲम्बुलन्स वेळेत आली नाही. तसेच मेडिकलचा मेमो लवकर न दिल्यामुळे ती ४५ मिनिटे उपचारांअभावी फलाटावरच होती. यानंतर तिला आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिथून एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र उपचारांचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे तिला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे १० दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. पण आज सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

अपघातात जखमी झालेली आमची मुलगी ४५ मिनिटे रेल्वेच्या फलाटावरच पडून होती. तिला वेळेत उपचार मिळाले असते तर आमची मुलगी नक्की वाचली असती, असे दिव्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे स्थानक प्रबंधक रामेश्वर प्रसाद मीना यांनी सांगितले की, दिव्याच्या उपचारात कोणतीही दिरंगाई झाली नाही. आम्हाला माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी लोकलने जखमी अवस्थेतील दिव्याला अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणले.

त्याचवेळी आणखी एक पथक दिव्याला आणण्यासाठी रवाना झाले होते. या पथकात ड्युटीवरील स्टेशन मास्तरही असल्यामुळे मेडिकल मेमो देण्यास उशीर झाला, असेही रामेश्वर प्रसाद मीना यांनी सांगितले. या सगळ्यात निष्काळजीपणा नसल्याचेही त्यांनी नमूद केले. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या प्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची किंवा पोलिसांची चूक असेल तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वेतील कोणी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात लक्ष घालतात का? हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात कुकरचा स्फोट झाल्यानं 14 जाण जखमी

Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

एसटीचा प्रवास धोक्याचा! वाहकाची मुजोरी, भंडाऱ्यात महिला एसटी बस वाहकाची प्रवाशाला मारहाण|VIDEO

Ananya Pandey Filmfare Look: बांधणी साडीमध्ये अनन्याचा हॉट लूक, फोटो खुपच सुंदर

SCROLL FOR NEXT