Arrest, Satara, Koregoan, Rahimatpur, Osmanabad Saam Tv
महाराष्ट्र

कोरेगाव तालुक्यात ट्रिपल मर्डर; युवतीसह मुलांच्या हत्येप्रकरणी राजेबाेरगावातील युवकास अटक

या घटनेचा पाेलीसांनी कसून तपास केला.

ओंकार कदम

सातारा (satara breaking news) : सातारा (satara) जिल्ह्यातील काेरेगाव (koregoan) तालुक्यात एका युवतीचा तिच्या दाेन मुलांसह खून झाल्याची घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथे योगिता (वय 38) या युवतीचा दत्ता नामदास (वय 30) याने तिचा अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा दाबून खून केल्याची माहिती पाेलीसांनी (police) दिली. तसेच नामदास याने तिच्या दाेन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. या घटनेतील एका मुलाचा मृतदेह पाेलीसांच्या हाती लागला आहे. (satara latest marathi news)

रहिमतपूरचे (rahimatpur) पाेलीस उपनिरिक्षक प्रमाेद सावंत यांनी दिलेल्या माहितीनूसार काेरेगाव तालुक्यातील राजेंद्र भिकु गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहणेस असणा-या दत्ता नामदास याच्या समवेत याेगिता राहत हाेती. तिचा घातपात झाल्याचा संशय घटनास्थळी गेलेल्या पाेलीसांना आला. त्यामुळे पाेलीसांनी दत्ता नामदास याच्याबाबत परिसरात चाैकशी केली. त्यावेळी ताे गावात दिसला नसल्याची माहिती समाेर आली. ताे मूळचा राजेबाेरगाव येथे असल्याचे पाेलीसांना समजले.याेगीता ही नामदास याच्या साेबत राहत हाेती. नामदास याने याेगीता हिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समाेर आली आहे.

चाैकशीअंती नामदास हा तिची बहीण ज्याेती अहिवळे यांच्या घरी असल्याचा संशय पाेलीसांना आला. त्यानूसार पाेलीस पथकाने अकलुज पाेलीस ठाणे येथे संपर्क साधत श्रीपुरबाेरगावंचे पाेलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून नामदास याच्याबाबत चाैकशी करण्यास सांगितले. या प्रकरणात श्रीपुरबाेरगावंचे पाेलीस पाटलांनी नामदास यास ताब्यात घेऊन अकलूज पाेलीसांच्या स्वाधीन केले.

रहिमतपूर पाेलीसांना दत्ता नारायण नामदास (मूळ राहणार राजेबोरगाव ता. जि. उस्मानाबाद (osmanabad) सध्या राहणार वेलंग शिरंबे (तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) याने दिलेल्या माहितीनूसार 15 जूनला याेगीता व तिची मुले समीर आणि तनु आणि त्याने रात्री जेवण केले. त्यानंतर सुमारे दहा वाजता झाेपी गेलाे. याेगिता हिचा परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून तिचा गळा दाबून खून केला. तसेच समीर व तनु यांना परिसरातील एका विहीरीत ढकलून दिले.

दरम्यान या प्रकरणी नामदास याच्यावर पाेलीसांनी खूनाचा दाखल केला आहे. याेगिता हिचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबास धक्का बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT