yogesh phalke, sangli, youth Saam Tv
महाराष्ट्र

Social Media त स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची आत्महत्या

या घटनेची नाेंद पाेलिसांत झाली आहे.

विजय पाटील

Sangli : सांगली (sangli) जिल्ह्यातील वाळवा (walva) येथील एका युवकाने (youth) रहात्या घरात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली असे नमूद केले हाेते. पाेलिस (police) या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

हा युवक फळ विक्रेता असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने रहात्या घरात आत्महत्या केली. बाराबिगा वसाहतीत आज (मंगळवार) सकाळी ही घटना उघडकीस आली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश सचिन फाळके तथा मालेवाडीकर (वय २४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.

योगेश याने आत्महत्येपुर्वी स्वतःच्या मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीसह नोटांच्या बंडलाचे फोटो डी.पी.वर सेव्ह केले होते. त्याच्या काही मित्रांनी तो डी.पी. पाहिल्यावर सकाळी त्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर योगेशच्या आत्महत्येचे प्रकरण समाेर आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: - नागपूरच्या वानाडोंगरीत ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT