यवतमाळ : दारव्हा नगराध्यक्ष आढळल्यास संपर्क करा ! संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळ : दारव्हा नगराध्यक्ष आढळल्यास संपर्क करा; अज्ञातांनी लावले पोस्टर्स

नगराध्यक्षांनी दिली पोलिसांत तक्रार...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ मधील दारव्हा शहरात कुण्यातरी अज्ञाताने ‘ नगराध्यक्ष साहेब कुठे आढळल्यास कृपया दुरध्वनी करुन संपर्क करुन कळवावे, हे दोन वर्षापासुन कार्यालयात नाहीत’ अशा मथळयाचे पोस्टर्स तहसिल तसेच बसस्थानक परिसरात लावल्याचे आज नागरीकांच्या निदर्शनास आले.

हे देखील पहा -

नेमके हे पोस्टर्स का व कुणी लावले याबाबत सध्या शहरात विविध चर्चेला पेव पुटले असुन, नगराध्यक्ष बबनराव इरवे यांनी मात्र, याबाबत दारव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दारव्हा नगर परिषदेला नगराध्यक्षपदी बबनराव दशरथ इरवे हे विराजमान असुन ते नगर परिषदेमध्ये उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर यापुर्वीही काही नगरसेवकांनी तसेच नागरीकांनी आरोप केला आहे.

तसेच त्यांची मुलेच नगरपालिकेत त्यांचा कारभार चालवत असल्याचे काहीजणांनी आरोप केले आहेत. पंरतु आता नगराध्यक्ष आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन कुण्यातरी अज्ञाताने पोस्टर्स लावुन केल्याने सध्या हा विषय दारव्हा शहरात मोठया प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे.

Edited By : Kurshnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT