Yavatmal Two People Drown Saam Tv News
महाराष्ट्र

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Yavatmal Two People Drown : यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून घाटंजी तालुक्यात दुपारपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना जोरदार पूर आला आहे. या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांचे बळी गेले आहेत.

Prashant Patil

संजय राठोड, साम टिव्ही

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून घाटंजी तालुक्यात दुपारपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना जोरदार पूर आला आहे. या पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये एक मृतक अज्ञात असून दुसऱ्या घटनेत शिरोली येथील वृद्ध मजुराचा मृत्यू झाला आहे.

कोपरी–येरंडगाव रस्त्यावर चिंचोली गावाजवळील पुलावरून गावकऱ्यांना वाघाडी नदीच्या पुरात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह वाहत जाताना दिसून आला. संजय तुरक पाटील आणि इतर ग्रामस्थांनी तो मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीला आलेल्या पुराचा प्रवाह इतका वेगवान होता की मृतदेह तरोडा गावाच्या दिशेने पुढे वाहून गेला. तर घाटंजी तालुक्यातील दुसऱ्या घटनेत शिरोली येथील संभाजी भुऱ्या आत्राम (वय ६०) यांचा नाल्याला आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत शेतात मजुरीचे काम करत होते. सकाळी ते शेतात गेले होते. काम संपल्यावर पत्नी घरी परतली, मात्र संभाजी आत्राम यांनी ‘मी नंतर येतो' असं सांगून शेतातच थांबले.

संभाजी आत्राम उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे संभाजी आत्राम हे नाला ओलांडताना वाहून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, माणीक विठ्ठल आत्राम यांच्या शेतालगत असलेल्या झाडाजवळ अडकलेल्या अवस्थेत संभाजी आत्राम यांचा मृतदेह आढळून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT