Yavatmal 27 thousand Ladki Bahin ineligible Saam Tv News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : अक्षय तृतीयेच्या तोंडावर बहिणींना भावाचा धक्का! तब्बल २७ हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण...

Yavatmal Ladki Bahin Yojna Ineligible : यवतमाळ जिल्ह्यात तब्बल २७ हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. कारण की, यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ७ लाख १९ हजार ८८० महिलांनी अर्ज केले होते.

Prashant Patil

यवतमाळ : राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेच आहे. विशेष बाब म्हणजे, या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झालाय. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात तब्बल २७ हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. कारण की, यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ७ लाख १९ हजार ८८० महिलांनी अर्ज केले होते. यापैकी ६ लाख ९२ हजार ५६३ महिला योजनेसाठी पात्र ठरल्या, या लाभार्थ्यांना आतापर्यंत नऊ हप्ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

परंतु, बँक खात्यांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यामुळे श्रीमंत लाडक्या बहिणींचं बिग फुटलं. यातून २७ हजार ३१३ अपात्र बहिणी पुढे आल्या असून या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आहे. या महिलांकडे शेती, घर, चारचाकी गाडी, दुचाकी, दुकान असल्यामुळे, तर काही महिला स्वतः नोकरी करत आहेत. यानंतरही त्यांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज सादर केले आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. या महिलांचं आधार कार्ड लिंक झाल्यानंतर या बाबी स्पष्ट झाल्या, त्यामुळे त्यांना योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार?

राज्य सरकारकडून राबिवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत यश प्राप्त झालं. मात्र, आता या योजनेवरून राजकारण सुरू आहे. या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोफ डागली. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ८ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. म्हणजेच १५०० वरून ५०० रूपये मिळणार आहेत. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतंरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता. मात्र, एप्रिल महिना सुरू होऊन १६ दिवस उलटले. तरीही दहावाचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही. आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Himachal Pradesh Landslide : काळाचा घाला! टॅक्सीवर दरड कोसळली; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

Ghavan Recipe: नाश्त्यासाठी बनवा कोकणी स्टाईल खमंग घावणे आणि झणझणीत नारळाची चटणी; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नागपूर-केंद्रीय मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चचे आयोजन..

Saturday Horoscope : मोठी गुंतवणूक टाळा; 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

SCROLL FOR NEXT