Yavatmal Crime Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime : यवतमाळ हादरले; चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, आईला मारल्याने मुलाने केला वडिलांवर हल्ला

Yavatmal News : संशयातून पतीने पत्नीवर तलवारीने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : पत्नीचे कोणत्या तरी अनैतिक संबंध असल्याचे म्हणत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती आपल्या पत्नीशी नेहमी वाद घालायचा. याच संशयातून पतीने पत्नीवर तलवारीने वार करत निर्घृण हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली या गावात घडलेल्या घटनेत बेबी दलुराम राठोड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दलूराम राठोड असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान पती संशय घेत असल्याने पती- पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. त्याच वादातून पतीने पत्नीवर तलवारीचे घाव घातले. तलवारीने वार केल्याने बेबी राठोड रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला. 

मुलाने केला वडिलांवर हल्ला 

दरम्यान आईवर वार केल्यानंतर मुलाने वडिलांवर हल्ला केला. त्यात मारेकरी दत्तूराम हा जखमी झाला आहे. हत्येची ही थरारक घटना यवतमाळच्या कारेगाव यावली येथे पहाटे दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी मुलाने वडगाव जंगल पोलीस ठाण्यात वडीला विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

दलित महिलेला दांडक्याने मारहाण

पंढरपूर : पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील उंबरे वेळापूर गावात एका दलित महिलेला दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. फोन का केला असा जाब विचारण्याच्या कारणावरून भर रस्त्यावर हरिदास भोसले याने शिवीगाळ करत महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हीडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला असून महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT