Yavatmal Crime News Physical abuse of 11-year-old school girl in Umarkhed Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News: पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांतच अटक

Yavatmal Crime News: पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात घडली आहे.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही

Yavatmal Umarkhed Crime News

पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. ही संतापजनक घटना यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. (Latest Marathi News)

अजिज खान मोहमद खान असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर दहा मर्डर, तीन बलात्कार आणि नऊ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उमरखेड (Yavatmal News) येथील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत शिकते. गुरुवारी शाळेत जाण्यासाठी ती नवीन पळशी फाट्यावर उभी होती.

यावेळी आरोपी दुचाकीवरुन आला. त्याने शाळेत पीडितेला शाळेत सोडण्याचा बहाणा केला. मात्र, पीडितेने याला नकार दिला. त्यानंतर त्याने माझी मुलगी तुझ्याच शाळेत शिकते, असे सांगितले. मी तुझ्या भावासारखा आहे. तू बस घाबरू नको, असे म्हणत तिला विश्वासात घेतले व तिला दुचाकीवर बसविले.

त्यानंतर आरोपीने पीडितेला बेलखेड परिसरात नेले. तिथे तिच्यावर जबरस्तीने अत्याचार (Crime News) केला. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. घटनेनंतर पीडिता शाळेत गेली. तिला पाहून काहीतरी विपरित घडलं, असा संशय शिक्षकांना आला. त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली.

आई-वडिलांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आपल्यासोबत घडलेला भयावह प्रकार पीडितेने सांगितला. यानंतर आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी काही तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच आरोपीला अटक केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT