Yavatmal Crime Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये खळबळ; एकाची दगडाने ठेचून हत्या, चोवीस तासात दुसरी घटना

Crime News Yavatmal: मुकिंदपूर पारधी बेड्या लगत फत्तू मोतीराम पवार यांच्या शेतात दगडाने ठेचून छिन्नविच्छिन्न रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. यामध्ये मृतकाच्या शरीरावर दगडाने वार केल्याचे व्रण आहेत

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : वाढती गुन्हेगारी हा एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. क्षुल्लक कारणांवरून एकामागून एक अशा खुनाच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यात मागील चोवीस तासात दोन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. यात यवतमाळच्या नेर तालुक्यातील मुकिंदपूर येथे एका इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

यवतमाळच्या नेर तालुक्यातील मुकिंदरपूर येथे सदरची घटना उघडकीस आली आहे. यात गावातील हरेश्वर मोतीराम निकोडे (वय ४२) असे घटनेत मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान आज सायंकाळी साडेपाच दरम्यान मुकिंदपूर पारधी बेड्या लगत फत्तू मोतीराम पवार यांच्या शेतात दगडाने ठेचून छिन्नविच्छिन्न रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. यामध्ये मृतकाच्या शरीरावर दगडाने वार केल्याचे व्रण आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 

शेतात मृतदेह असल्याचे लक्षात येताच काही ग्रामस्थांनी याची माहिती नेर पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ही हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. या अनुषंगाने पोलिसांकडून तपासाला सुरवात कारणात आली असून याचा उलगडा पोलिस तपासातूनच समोर येईल. 

गावात चोवीस तासात दुसरी घटना 

यवतमाळ जिल्ह्यातील मुकिंदरपूर या गावात मागील चोवीस तासात खून झाल्याची दुसरी घटना घडली आहे. चोवीस तासांत दुसरे हत्याकांड समोर आल्यामुळे गावासह नेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या दोन्ही खुनाच्या घटनेत एकाच व्यक्तीचा समावेश आहे, कि कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र पहिल्या घटनेचा तपास पूर्ण झाला नसताना दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT