adv gunaratna sadavarte Saam Tv News
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte : 'हजारो लग्न झालेल्या महिला पाकिस्तानातून भारतात आल्या?'; गुणरत्न सदावर्ते यांना नेमकी कसली शंका?

Gunaratna Sadavarte on Pakistani Citizens : 'हजारो लग्न झालेल्या महिला या पाकिस्तानातून भारतात आल्या. हे लक्षात येत आहे. त्यामुळे हे मॅरेज जिहाद आहे का? हे सुद्धा तपासणं जरुरीचं आहे', असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

Prashant Patil

यवतमाळ : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना बंदी घातली आहे. तसेच आपापल्या नागरिकांना मायदेशी परत बोलावलं आहे. त्यामुळे भारतात आलेले पाकिस्तानी नागरीक पाकिस्तानात परत जात आहेत. तर पाकिस्तानला गेलेले भारतीय नागरिक हे परत मायदेशी येत आहेत. यातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. 'हजारो लग्न झालेल्या महिला या पाकिस्तानातून भारतात आल्या. हे लक्षात येत आहे. त्यामुळे हे मॅरेज जिहाद आहे का? हे सुद्धा तपासणं जरुरीचं आहे', असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

'हा मॅरेज जिहाद असेल तर त्याला प्रेम, लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये. ही एक दहशतवादी कारवाई आहे. हे एक अंडरवर्ल्ड क्रॉसबॉर्डर टेररिझम आहे. हे टेररिझम ठरवून चाललं आहे. या मॅरेज जिहादला थांबवणं आवश्यक आहे. हे लग्न नसून अतिरेकी कारवाई करण्यासाठीची प्रक्रिया आहे का? हे तपासलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे', असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आव्हाडांवर संताप व्यक्त केला. 'जितेंद्र आव्हाड यांनी मॅरेज जिहादवर बोललं पाहिजे. पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही. या देशात मीडिया चौथा स्तंभ आहे. जितेंद्र आव्हाड आमच्या पत्रकारांना भीती घालण्याएवढे तुम्ही मोठे कधी झालात? ही भीती पत्रकारांना चालत नाही. मॅरेज जिहादवर बोला. पाकिस्तानातून किती आणल्या? त्यांच्यावर कारवाई काय केली, यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोललं पाहिजे', असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्तरंजित थरार! काँग्रेसच्या बड्या नेत्यावर धारदार शस्त्राने वार; डोक्याचे केले २ तुकडे

Transfer: निवडणूक आयोगाकडून २६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या; निवडणुकांपूर्वी प्रशासनात उलटफेर

RR vs CSK : गुवाहाटीत होणार 'खेळ'! राजस्थान रॉयल्स-चेन्नई सुपरकिंग्ज सामना रद्द होणार? हवामानाचा इशारा काय?

Homemade Thandai Recipe: पोटाची जळजळ ते अशक्तपणा होईल दूर, उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल गारेगार थंडाई

Pan Card: नावाची स्पेलिंग चुकली? तर तुमचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून होईल बंद, घरबसल्या ५ मिनिटांत करा हे काम

SCROLL FOR NEXT