Yashomati Thakur addressing tribal citizens during her Melghat visit, raising concerns over delayed MGNREGA payments and healthcare crisis Saam Tv
महाराष्ट्र

होळीच्या तोंडावर आदिवासींचे मनरेगाचे पैसे थकले; यशोमती ठाकूरांचे सरकारवर जोरदार टिकास्त्र

Yashomati Thakur Allegation On Mahayuti Government: मेळघाटातील आदिवासी कामगारांचे मनरेगाचे पैसे थकवल्याचा आरोप करत यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

महायुती सरकारचे मेळघाटकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. मेळघाटात होळीचा सण आदिवासींचा महत्त्वाचा सण असतो परंतू सणाच्या तोंडावर आदिवासी बांधवांचे मनरेगाच्या रोजगाराचे हक्काचे पैसे सरकारने थकविले आहेत, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ज्या हरीसाल गावाचा सरकारने डीजिटल व्हिलेज म्हणून गाजावाजा केला तिथे साधी फोन ला रेंज येत नाही अशी परिस्थिती आहे, असे त्या म्हणाल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, अमरावती जिल्हा युवक काँग्रेसमधील नेते होळी सणानिमित्त मेळघाट दौऱ्यावर आले होते.

लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत -

यशोमती ठाकूर यांनी मनरेगाच्या विषयावरून सरकारवर टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने MREGS चा कायदा बदलला मनरेगाला आता ते जी राम जी म्हणतात. जर ते रामजी म्हणतात, तर शेवटच्या नारायणापर्यंत धनलक्ष्मी पोहचली पाहिजे. पण गरिबांच्या डोळ्यात अश्रु आहेत. तीन तीन महिने मनरेगा कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. होळीच्या तोंडावर १५०० रुपये सरकारने जमा केले आणि उर्वरीत रक्कम थांबवली आहे.

तसेच काही लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. मनरेगाचा कायदा बदलून या गरीब जनतेवर सरकारने खूप मोठा हातोडा मारला आहे. जिथे ३०० दिवस काम मिळत होते. तिथे १२५ दिवस काम मिळणार आणि तेही एका मस्टरवर आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे दिली असता येथे डॉक्टर गायब आहे. वैद्यकीय अधिकारी माने आहेत ते आठ ते १५ दिवसांपासून आलेले नाहीत. त्यांना जाब विचारला असता आमचे ट्रेनिंग होते असे थातूरमातूर उत्तर दिले. मेळघाटात सिकलसेल मोठ्या प्रमाणात आहे. पण सिकलसेलची औषधे आणि उपचाराची व्यवस्था नाही. इथे गरोदरमाता, कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभागाची जी वाहने आहेत, त्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. रुग्णांच्या बेडवरील चादरा आठ आठ दिवस बललल्या जात नाहीत, अशा तक्रारी येथे आहेत. येथे कोणाचा धाक नाही, मेळघाटमध्ये सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, अशी टिका ठाकूर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT