Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Rasta Roko Andolan : कोल्हापूर महापालिकेच्या विराेधात नागरिकांचा रास्ताे राेकाे, पाेलीस घटनास्थळी दाखल

या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेचा स्वच्छ व सुंदर कोल्हापूर असल्याचा दावा फोल ठरु लागला आहे. शहरातील यादव नगर परिसरात रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येऊ लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यातूनच नागरिकांनी रास्ता रोको आंदाेलन छेडले आहे. (Maharashtra News)

स्वच्छ व सुंदर कोल्हापूर असल्याचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या दावा फोल ठरलाय. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि मिश्रित सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक आक्रमक झालेत. ड्रेनेजचे पाणी वारंवार रस्त्यावरती येत असल्यामुळे आक्रमक झालेल्या कोल्हापुरातील यादव नगर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या कित्येक दिवसापासून यादव नगर परिसरात ड्रेनेज तुंबल्यामुळे मैला मिश्रित पाणी थेट रस्त्यावरती येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

आक्रमक झालेल्या यादव नगर परिसरातील नागरिकांनी थेट रास्ता रोको केलाय. जवळपास अर्धा तासाच्या रास्ता रोको नंतर राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांशी रास्ता रोको करणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिकेचे अधिकारी जोपर्यंत दाखल होत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

Drinking water before bed: झोपण्याआधी किती तास आधी आणि किती पाणी प्यावं? फायदे-तोटे जाणून घ्या

CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

Khaja Recipe: सणासुदीला घरच्या घरी कुरकुरीत आणि गोड खाजा करा तयार, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT