baby, chandrapur news, chandrapur crime news saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : बाळाला दूध पाजून आई ICU तून बाहेर पडली अन् घडलं भयंकर

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

संजय तुमराम

Chandrapur Crime News : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळ चोरीची धक्कादायक घटना समाेर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी तातडीने बैठक घेतली. त्यानंतर पाेलिसांनी सखाेल तपास सुरु केला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून आज (मंगळवार) सकाळी सहा वाजता वार्ड क्रमांक 15 मधून अनोळखी महिलेने बाळासह रुग्णालयाबाहेर पलायन केले. काही मिनिटांआधीच बाळाच्या मातेने शिशु अतिदक्षता कक्षात बाळाला दूध पाजले होते.

त्यानंतर 2 मिनिटातच एक अनोळखी महिला बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर गेल्याचे सीसीटीव्ही यंत्रणेतून उघड झाले. या धक्कादायक घटनेनंतर रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी तातडीने बैठक घेत याविषयी चौकशी सुरू केली.

विविध ठिकाणी पाेलिसांची पथके रवाना

प्राथमिक चौकशीत संशयित आरोपी महिलेचे फुटेज निष्पन्न झाले आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. विविध पोलीस पथके बाळ व संशयित महिलेचा माग काढत आहेत. महिलेच्या शोधासाठी पाेलिसांनी रेखाचित्र काढण्याचे नियाेजन केले आहे. दरम्यान बाळ चोरीमागे नक्की कोणता उद्देश आहे याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

भाजप नेत्याकडून PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष; ५०० वाहनांचा ताफा काढून केलं शक्तिप्रदर्शन, VIDEO

SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

रात्री झोपताना ब्रा काढून का झोपावे? त्रास होण्यापूर्वी ही धक्कादायक माहिती वाचा

SCROLL FOR NEXT