Women's and Youngsters Movement for liquor ban in Nandurbar
Women's and Youngsters Movement for liquor ban in Nandurbar  दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: दारुबंदीसाठी महिलांसह युवकांचा एल्गार; हातात लाठ्या-काठ्या घेऊन हातभट्ट्या केल्या उध्वस्त

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: शहादा तालुक्यातील शेवटचं गाव गोणोर (Gonor) अगदी मध्यप्रदेश (Madhaya Pradesh) राज्याच्या सीमेला लागून आहे. मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा (Illegal stockpiling of liquor) विक्रीसाठी गावात येत असतो त्याच प्रकारे हातभट्टीची दारू देखील गावात (Nandurbar) तयार होत असल्याने अनेक परिवारांचा संसार दारूमुळे उध्वस्त होत आहे. गावात दारूबंदी (Alcohol Ban) व्हावी अशी मागणी वारंवार ग्रामपंचायत सभेत सरपंच व प्रशासनाकडे केली आहे.

हे देखील पहा -

अनेकदा दारुबंदीची मागणी करुनही दारूबंदीवर तोडगा निघत नसल्याने बचत गटाच्या महिलांनी युवकांना सोबत घेत हातात लाठ्या-काठ्या घेऊन दारूबंदीचा नारा दिला तसेच सर्व हातभट्टीची दारू नष्ट करण्याची मोहीम राबवली. प्लास्टिक पिशवी आणि रबरी ट्यूबमध्ये ठेवलेली दारू सदर महिला आणि युवकांनी जमिनीवर ओतून नष्ट केली. दारूबंदीसाठी महिला आणि युवकांचा ताफा बघून अवैध दारू व्यवसायिकांना चांगलाच घाम फुटला होता.

दरम्यान गावात अवैध पद्धतीने दारूविक्री करणाऱ्या नागरिकांना चौकात बोलून भर सभेत पूर्णपणे दारूबंदी करण्याचा सज्जड इशारा दिला. गावाच्या विकासासाठी महिला आणि युवकांनी घेतलेल्या या दारूबंदीच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाच्या अनुपस्थित दारू नष्ट करून सभेद्वारे नागरिकांना दारूबंदीचा दिलेला आदेश पाळण्यासाठी पोलिस प्रशासनानेदेखील मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT