Ratnagiri Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri Crime News: महिलेची हत्या केली, ६ वर्षांच्या मुलालाही संपवलं; नवरा गायब, लांजामधील मन सुन्न करणारी घटना

Priya More

Ratnagiri News: रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) पतीने पत्नीची हत्या करुन मुलाची देखील हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरले आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी (Ratnagiri Police) गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोटा गावामध्ये ही घटना घडली आहे. आई आणि मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पतीनेच दोघांची हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लांजा तालुक्यातील कोट गावातील ही मन सुन्न करणारी घटना आहे. सोनाली चांदिवडे (२६ वर्षे) आणि प्रणव चांदिवडे (६ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे.

सोनालीचा मृतदेह घराच्या मागच्या बाजूला आढळून आला. तर प्रणवचा मृतदेह घरामध्ये आढळून आला. सोनालीच्या गळ्यावर धारधार शस्त्राचे वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. पोलिसांनी सोनालीचा पती संदेश चांदिवडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '१० दिवसांपूर्वी ही महिला घरातून लांजा येथे निघून गेली होती. चार दिवसांपूर्वीच ती घरी परत आली होती. नवरा बायकोच्या भांडणामध्येच ही घटना घडली आहे. पतीनेच पत्नी आणि मुलगा या दोघांची हत्या केल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT