Crime News Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! खून झालेल्या महिलेचा मृतदेह आरोग्य विभागाने दोन रुग्णालयातून केला रेफर

हिंगोलीत आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा फटका खून झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना बसला आहे

संदीप नागरे

हिंगोली - हिंगोलीत (Hingoli) एक धक्कदायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या (Health Department) गलथान कारभाराचा फटका खून झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना बसला आहे. आरोग्य विभागाच्या टोलवाटोलविने चक्क मृत महिलेचा मृतदेह दोन रुग्णालयातून तिसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पाहा -

काल सकाळी औंढा तालुक्यातील टेंभुरधरा शिवारातील एका शेतात अहिल्याबाई खुडे या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी औंढा तालुक्यातील पिंपळदरी आरोग्य केंद्रात दाखल केला होता. मात्र, त्याठिकाणी शवविच्छेदनाची सोय उपलब्ध नसल्याने हा मृतदेह औंढा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

मात्र, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी अहिल्याबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास स्पष्ट नकार देत त्यांचा मृतदेह हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केला. त्यामुळे खून झालेल्या अहिल्याबाईंचा मृतदेह तब्बल सहा तास पोलीस व नातेवाईक सोबत घेऊन फिरत होते. रात्री उशिरा अखेर रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देत या मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रेत पोलीस व नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या संतापजनक घटनेनंतर आता नातेवाइकांनी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

SCROLL FOR NEXT