Satara News:  Saam tv
महाराष्ट्र

Satara News: सेल्फी घेणं पडलं महागात, महिला पर्यटक ३०० फूट खोल दरीत पडली

Satara News: साताऱ्यातील महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट वर सेल्फी काढताना तोल जाऊन महिला पर्यटक दरीत कोसळ्याची घटना घडली आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Satara News:

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट वर सेल्फी काढताना तोल जाऊन महिला पर्यटक दरीत पडल्याची घटना घडली आहे. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत पडल्याने महिला पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

महिला पर्यटक ३०० फूट दरीत पडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरीत पडलेल्या या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न महाबळेश्वर ट्रेकर्स,सह्याद्री ट्रेकर्स, पोलीस, वन विभागाकडून करण्यात येत होते. मात्र, या महिलेचा मृतदेह खोल दरीत आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना दरीत पडलेल्या महिलेचा ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत महिला पुण्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अंकिता सुनिल शिरसकर असे तिचे नाव आहे.

२३ वर्षांच्या अंकिताचा महाबळेश्वर येथील तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिला दरीत पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.

अंकिता दरीत कशी पडली?

मृत अंकिता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. यावेळी अंकिता केट्स पॉईंट परिसरातील नीडल होल पॉईंट येथे सेल्फी घेत होती. यावेळीच अंकिताचा तोल गेला आणि ती दरीत पडली.

दोनशे ते तीनशे फूट दरीत पडल्याने अंकिताचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी पोहोचली. यानंतर घटनास्थळी बचावकार्यास सुरुवात केली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत या महिलेचा मृतदेह आढळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद पेटला; अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवार गटावर हल्लाबोल

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे; पत्रावर घेतली स्वाक्षरी? नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

SCROLL FOR NEXT