Raigad Crime News  Saam tv
महाराष्ट्र

कॉफीत टाकले गुंगीचे औषध, अश्लील फोटो काढून महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी, त्यानंतर...

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात (crime news) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉफीत गुंगीचे औषध टाकून एका तरुणाने महिलेचे अश्लील फोटो काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अश्लील फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यासह मुलीसोबत शारिरीक सुखाची (Physical relationship demand) मागणी एका नराधमाने केली होती. हे अश्लील फोटो नातेवाईकांकडे आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी कोमटेक एजन्सीच्या गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने दिली होती. अनंत बासू मातारी असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात माणगाव (Police case filed) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनंत बासू मूळचा आसाम येथील आहे. २०१५ पासून बासूने पीडित महिलेला मानसिक त्रास दिला. बासूच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. त्यानंतरही बासू पीडितेला त्रास देऊन ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर आरोपी बासूने पीडितेकडून ६ लाख ७० हजार रुपये उकळले. इतकच नव्हे तर पीडितेकडे आणि तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडितेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT