रुग्णालयाच्या मनमानीमुळे राहुरीमध्ये भर रस्त्यातच महिलेची प्रसूती! SaamTvnews
महाराष्ट्र

रुग्णालयाच्या मनमानीमुळे राहुरीमध्ये भर रस्त्यातच महिलेची प्रसूती!

महिलेच्या नातेवाईकांकडून विनवण्या करण्यात आल्या होत्या. तरीही महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला गेला.

गोविंद साळुंके

अहमदनगर : शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या देवळाली प्रवरा येथे हा प्रकार घडला आहे. देवळाली प्रवराच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये (Government Hospital) ही महिला प्रसूतीसाठी गेली असता या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. महिलेच्या नातेवाईकांकडून विनवण्या करण्यात आल्या होत्या. तरीही महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला गेला.

हे देखील पहा :

खाजगी रुग्णालयात जात असतानाच रस्त्यामध्ये कमल शिंदे या महिलेची प्रसूती (Delivery) झाली. यावेळी स्थानिक महिलांनी प्रसूती पार पाडली. त्यामुळे या रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. यावेळी आरपीआयचे सुरेंद्र थोरात यांनी ग्रामीण रुग्णालय बाहेर ठिय्या मांडला. अतिशय गरीब कुटुंबातील कमल शिंदे या महिलेला प्रसूतीसाठी तिचे नातेवाईक देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल करण्यासाठी गेले होते.

तिला प्रसूतीच्या वेदना देखील सुरू झाल्या होत्या. हा सर्व प्रकार रुग्णालयातील डॉक्टरांना सांगण्यात आला. मात्र, तिला ऍडमिट करून घेण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी (Doctor) नकार दिला. नातेवाइकांकडे कोणतेही साधन नसल्याने ते पाई त्या ठिकाणाहून खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. मात्र, या महिलेला रस्त्यातच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि रस्त्यामध्येच तिची प्रसूती झाली. त्यावेळी जवळ असणाऱ्या महिलांनी तिची प्रसूती पार पाडली. यानंतर रुग्णालयातील नर्स व डॉक्टर त्याठिकाणी धावत आले आणि त्या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करून घेतल आहे.

कमल शिंदे या महिलेस प्रसूतीसाठी एक महिना बाकी होता. त्यामुळे आम्ही तिला दाखल करून घेतलं नाही. रुग्णालयातील सिस्टर त्यांनी तिची सर्व तपासणी केली. प्रसूतीसाठी एक महिना दोन दिवस बाकी होते. म्हणून सदर महिलेला सिस्टर नी सांगितलं की तुला अजून वेळ आहे. तू घरी जाऊन काहीतरी खाऊन ये अन ती बाहेर गेल्यानंतर तिची अचानक डिलिव्हरी झाली असं देवळाली (Deolali) रुग्णालयातील डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

SCROLL FOR NEXT