chandrapur, tiger,  saam tv
महाराष्ट्र

Tadoba News : सुधीर मुनगंटीवारांचा विभाग नेमकं करताेय तरी काय ? प्राणीमित्र संतप्त

एखाद्या मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

संजय तुमराम

Chandrapur News : गेल्या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात सहा वाघांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वीच ताडोबाच्या बफर क्षेत्रातील आगरझरी येथे एक बछडा आणि शिवनी क्षेत्रात वाघीण मृत्यू पावली होती. ही घटना घडत नाही तोच आज पुन्हा वाघाच्या ४ बछड्यांचा मृत्यू झाला.

ताडोबा व्याघ्र (tiger) प्रकल्पाच्या हिरडी नाला परिसरातील घटना आहे. या चारही मृत पिल्लांचं वय अंदाजे 3 ते 4 महिने आहे. मृत पिलांच्या अंगावर जखमा असल्याने परिसरात असलेल्या अन्य एखाद्या मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

या पिल्लांची आई कोण, ती कुठे आहे, ती पिल्लांच्या जवळ का नव्हती, तिची शिकार झाली का, असे अनेक प्रश्न घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी वन विभाग (forest department) नेमका काय करतो, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT