Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरात जादूटोणा; ११ जणांवर गुन्हा दाखल

फिर्यादीच्या घरी खड्डा खोदून नरबळी देण्यास सांगून बकऱ्याचा बळी द्याययला लावला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर

कोल्हापूर - पुरोगामी कोल्हापुरात (Kolhapur) जादूटोणा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा कायद्याअंतर्गत कोल्हापुरात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Latest News)

शहरातील शुक्रवार पेठ आणि करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील तळ्यावर हा अघोरी प्रकार घडला होता. २३ डिसेंबर २०२१ ते २९ सप्टेंबर २०२२ मध्ये हा अघोरी प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. तुला गुप्तधन मिळवून देतो असं सांगून वेळोवेळी फिर्यादीच्या बहिणीकडून चार लाख चाळीस हजार रुपये उकळल्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचं फिर्यादीच्या घरी खड्डा खोदून नरबळी देण्यास सांगून बकऱ्याचा बळी द्याययला लावला होता.

या प्रकरणी अकरा जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आयपीसी 420,34 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3 (2)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT