Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट कुणी केलं हे कळलंय; CM शिंदे मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत (पाहा व्हिडिओ)

मुख्यमंत्री शिंदेंचा राेख नेमका काेणावर?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur Winter Assembly Session - आजपासून नागपुरात आज हिवाळी आधिवेशनाला सुरवात झाली आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अजित पवार यांनी सीमावादावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तिथले मुख्यमंत्री महाराष्ट्राची बदनामी करणारी विधानं करतात तरी सरकार काही यावर काही बोलत नाही असा हल्लबोल अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे सरकारवर केला. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,सीमावाद प्रश्नी मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू तिथं मांडली. यात बोम्मईंकडून केली जाणाऱ्या ट्विट्सचाही मुद्दा आम्ही उचलला. त्यावर बोम्मईंनी ते ट्विटस आपण केलेली नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच ते ट्विट कुणी केलं आहे याची माहिती त्यांनी शोधून काढली आहे. तसंच या ट्विट्समागे कोणता पक्ष आहे याची माहिती देखील लवकरच समोर येणार. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा तिथल्या बांधवांच्या पाठिशी कसं उभं राहता येणार यावर लक्ष द्यायला हवं, राजकारण करायला खूप विषय आहेत. बाकी विषयावर राजकारण करा असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मंत्र्यांना महापुरुषांची पुस्तकं दिली भेट

विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून, महापुरुषांबद्दल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा गाजणार आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, तसेच इतर आमदारांनी मंत्र्यांना महापुरुषांची पुस्तके भेट दिली. या पुस्तक वाटप कार्यक्रमात मंत्री दीपक केसरकर यांना रोहित पवार, अमोल मिटकरी, इंद्रनील नाईक, सुनील भुसरा, अतुल बेनके यांनी महापुरुषांची पुस्तके भेट दिली.

विधान भवनात शिवसेना कार्यालयाची विभागणी

विधानसभेत शिवसेना कार्यालयाची विभागणी करण्यात आली. शिवसेना कार्यालयातील चार खोल्यांपैकी दोन खोल्या ठाकरे गटासाठी, तर दोन खोल्या या शिंदे गटाला देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

Petrol-Diesel: देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? PM मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT