Mahavikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : मविआ प्रयोगाचा सर्वाधिक फटका कुणाला? ठाकरे मविआतून बाहेर पडणार?

Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मातोश्रीवर झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांनी एकला चलो रे चा सूर लावला. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uddhav Thackeray likely to leave MVA : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अपयशाची चर्चा सुरु झालीय.. मात्र महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त फटका नेमका कुणाला बसलाय? लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यानंतर 4 महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला 50 जागांचा टप्पाही पार करता आला नाही..त्यातच महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक फटका कुणाला बसला? पाहूयात...

मविआत कुणाचे किती आमदार?

काँग्रेस- 17

राष्ट्रवादी (SP)- 10

ठाकरे गट- 20

विधानसभा निवडणुकीतही मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय. कारण ठाकरे आणि पवारांचा पक्ष फुटलाय. त्यामुळे त्यांच्या टक्केवारील घसरण अपेक्षित होती. त्यामुळे काँग्रेससमोर आपली टक्केवारी राखण्याचं मोठं आव्हान होतं. आणि त्यात काँग्रेस सपशेल फेल ठरली. कोणला किती टक्के मतं मिळाली आहेत ते पाहूयात..

मविआतील मतांचं गणित

2019 मधील मतांचं गणित

काँग्रेस- 15.87 टक्के

राष्ट्रवादी (संयुक्त)- 16.71 टक्के

शिवसेना (संयुक्त)- 16.41 टक्के

2024 मधील मतांचं गणित

काँग्रेस- 12.41 टक्के मतं

राष्ट्रवादी (SP)- 11.28 टक्के मतं

ठाकरे गट- 9.96 टक्के मतं

आतापर्यंत मुस्लीम ही काँग्रेसची हक्काची व्होट बँक मानली जायची. मात्र भाजपसोबत सर्वाधिक संघर्ष करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे ही मतं वळल्याचं लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही दिसून आलं. एवढंच नव्हे तर मुंबईत ठाकरे गटाचा एक मुस्लिम आमदारही निवडून आलाय.

त्यामुळे ठाकरेंच्या हाती नवी व्होट बँक लागलीय. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंकडे केवळ १५ आमदार होते. त्याची संख्या वाढून 20 झाली. काँग्रेसच्या जागा मात्र गेल्या विधानसभेच्या तुलनेत तिपटीनं कमी झाल्या. असं असलं तरी ठाकरेंच्या हातून हिंदूंची मतं कमी होत असल्याचंही दिसून आलं. आणि त्याचा त्यांना फटका बसलाय.

आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे-काँग्रेसनं स्वतंत्र लढावं की आघाडी करावी याबाबत संभ्रमाचं वातावरण दोन्ही पक्षात दिसतंय. त्यामुळे ठाकरे आपल्याकडे वळलेली मुस्लीम मतं राखण्यासाठी काँग्रेससोबत जाणार की मुस्लीम उमेदवारांची संख्या वाढवून स्वबळाचा नारा देणार याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT