bacchu kadu, ravi rana, eknath shinde, amravati saam tv
महाराष्ट्र

आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटणार? मुख्यमंत्री करणार मध्यस्थी

अमरावती जिल्ह्यात राणा व कडू वादावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हा वाद आता मिटणार असल्याचे बोलले जात आहे. कारण या प्रकरणात आता खुद्द एकनाथ शिंदे स्वतः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. (Maharashtra Political Crisis)

रवी राणा आणि बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण दिलं आहे. आज मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक होणार आहे.

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

दोघांमध्ये वाद सुरू असलेला वाद शमविण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करावी असे आवाहन केले होते. त्यानंतर आज मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आता काई नवीन वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT