will ajit pawar attend diwali celebration with sharad pawar in govindbaug on eve of padwa 2023 SAAM TV
महाराष्ट्र

Baramati : काैटुंबिक कार्यक्रमात काका- पुतणे एकत्र येणार? पवारांच्या गोविंदबागेत पाडव्याची तयारी पूर्ण

मंगेश कचरे

Baramati News :

बारामती शहरातील गोविंदबागेत दिवाळी पाडव्याची (Diwali Padwa 2023) जय्यत तयारी सुरु आहे. या ठिकाणी मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आलेली आहे. येथे उद्या प्रतिवर्षाप्रमाणे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (sharad pawar) आणि त्यांचे कुटुंबिय नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत. हा काैटुंबिक कार्यक्रम असल्याने पवार यांच्यासह त्यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे दाेघे एकाच व्यासपीठावर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे उद्याचा पाडवा हा बारामतीकरांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. (Maharashtra News)

राजकीय सत्तांतर काहीही घडो परंतु वर्षानुवर्ष पवार कुटुंबीय बारामती एकत्र येऊन चार ते पाच दिवस दिवाळी साजरी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. बारामतीत पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्याकरिता राज्यभरातून नागरिक बारामतीत येत असतात.

गोविंद बागेत शुभेच्छा स्वीकारण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार एकाच मंचावर असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्याच्या साेहळ्यासाठी गोविंदबागेत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यात आले आहे. उद्याच्या पाडव्याच्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT