Pune Crime News
Pune Crime News Saam TV
महाराष्ट्र

Pune Crime News:चारित्र्यावर संशय घेत चाकू भोसकून पत्नीची हत्या

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News: पुण्यातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पती पत्नी दोघेही हडपसरच्या भेकराईनगरमध्ये राहत होते. पोलिसांनी नराधम पतीच्या मुसक्या अवळल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार,ज्योती राजेंद्र गायकवाड (वय वर्षे २८) असे मृत महिलेचे नाव आहे. तसेच राजेंद्र गायकवाड (वय वर्षे ३१) असे हत्या आरोपी पतीचे नाव आहे. राजेंद्र एक अभियंता आहे. हडपसर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी राजेंद्रला ताब्यात घेतले आहे. ज्योती आणि राजेंद्र या दोघांमध्ये सतत वाद होत असायचे. राजेंद्रने या आधी देखील पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली होती, असे पोलिसांनी (Police) सांगितले.

तसेच आज झालेल्या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (Monday) पुन्हा एकदा या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. राजेंद्रला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने कसलाही विचार न करता पत्नीच्या पोटात चाकू खुपसला. यात ज्योती गंभीर जखमी झाली. तसेच तिथेच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी राजेंद्रला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT