सोलापूर - प्रसिद्ध हॉटेल अजिंक्यचे संचालक धनंजय ठेंगील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण धनंजय याने हुंड्यासाठी आपल्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. व्यवसायासाठी माहेरुन 25 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पतीसह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तगदा लावल्याचा आरोप पिडीत पत्नीने केला आहे. त्याचबरोबर पती धनंजय ठेंगील याने दुसरे लग्न केल्याचा आरोपही पिडित महिलेने केला आहे.
हे देखील पहा -
दरम्यान पिडीतेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भादवि 498-अ, 494,323,506 आणि 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
पीडित महिलेने व्यवसायासाठी माहेरुन 25 लाख रुपये आणावेत, यासाठी धनंजय आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तगदा लावला होता. त्याचबरोबर धनंजय ठेंगीलने दुसरा विवाह केल्याचा दावाही पीडित महिलेने केला आहे. या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.