धक्कादायक! बायकोने नवऱ्याला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! बायकोने नवऱ्याला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार

आर्वी गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्धा : जिल्ह्याच्या आर्वी पोलीस ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेने आपल्या नवऱ्यालाच गावामधील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायला लावले आहे. आरोपी महिलेने संशयी वृत्तीतून हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दाम्पत्यास अटक (arrested) करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत. संबंधित घटना आर्वी (Arvi) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील (village) आहे. पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे बघून आरोपी महिला तिला आपल्या घरी घेऊन आली होती. पीडित मुलीला घरी आणल्यावर आरोपी महिलेने तिला 'तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न (married) कर' असे म्हणत घरात नवऱ्यासोबत कोंडले. घराचा दरवाजा बाहेरून बंद करून आरोपी महिला निघून गेली.

पीडित मुलीला एकटे बघून आरोपी पतीने तिच्यावर बळजबरी करत बलात्कार (abuse) केला आहे. काही वेळाने पत्नी घरी आली. यानंतर तिने परत एकदा डोळ्यासमोर पतीला पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास भाग पाडले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी दाम्पत्याने घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेल, अशी धमकी पीडितेला देण्यात आली होती. आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पीडित मुलीने तिच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना (Family) सांगितला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आर्वी पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी महिलेने नेमक्या कोणत्या कारणातून हा धक्कादायक प्रकार करायला लावला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा तपास आर्वी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

SCROLL FOR NEXT