Suicide
Suicide SaamTV
महाराष्ट्र

Suicide: डायनिंग टेबलचा हट्ट बेतला जीवावर; शीघ्रकोपी बायकोची गळफास लावून आत्महत्या !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते -

नागपूर : दिवाळीत पत्नीने आपल्या नवऱ्याला डायनिंग टेबल Dining Table घेऊन द्या.. अशी सतत मागणी केली होती मात्र तिचा हट्ट नवऱ्याने पुरविला नाही, नवऱ्याने आर्थिक विवंचनेच दिलेलं कारण जिव्हारी लागल्याने नाराज झालेल्या शीघ्रकोपी बायकोने थेट गळफास लावून आत्महत्या Sucide केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या (Hudkeshwar Police Station) हद्दीतील बेसा मधील टेक ऑफ सिटी (Take of City) मध्ये घडली आहे.

हे देखील पहा -

संगीता राजन पाटील (Sangeeta Rajan Patil)असे मृत महिलेचे नाव आहे. संगीताचे पती खाजगी नोकरी करतात त्या गृहिणी आहेत दिवाळीची खरेदी झाल्यानंतर त्यांनी घरात नवीन डायनिंग टेबल घेण्याची मागणी पतीकडे लावून धरली होती. मात्र बजेट नसल्याने राजन यांनी संगीताच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र भाऊबीजेच्या Bhaubeej दिवशी सकाळपासूनच संगीता यांनी डायनिंग टेबल चा हट्टा धरला होता.

मात्र संगीता यांना राजन यांनी आपण काही डायनिंग टेबल काही दिवसानंतर घेऊ असे म्हणून विषय बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र शीघ्रकोपी स्वभावाच्या संगीताला नकार जिव्हारी लागला बरीच आदळआपट केल्यानंतर त्यांनी शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली राजेंद्र शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची (Sudden death) नोंद केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT